Ad will apear here
Next
‘फेअरसेंट’ला ‘आरबीआय’चे ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र
मुंबई : ‘फेअरसेंट.कॉम’ या भारतातील सर्वात मोठ्या ‘पी२पी’ कर्ज मंचाला भारतीय रिझर्व बँकेकडून (आरबीआय) ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र मिळाले आहे, ज्यामुळे या उद्योगातील त्यांचे स्थान अग्रणी असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय नियामकाकडून ‘एनबीएफसी-पी२पी’ म्हणून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त ‘फेअरसेंट.कॉम’ हा देशातील पहिला पी२पी कर्ज मंच बनला आहे.

‘फेअरसेंट.कॉम’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रजत गांधी म्हणाले, ‘देशातील सर्वात मोठा पी२पी मंच आणि या क्षेत्रातील आद्यप्रवर्तक म्हणून ‘फेअरसेंट.कॉम’ने भारतातील ऑनलाइन ‘पी२पी’ कर्ज क्षेत्राला नियामक संस्थेकडून मान्यता मिळवून देण्यास मदत केली आहे. ‘आरबीआय’कडून ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र मिळवणारी या क्षेत्रातील पहिली कंपनी बनणे हा ‘फेअरसेंट.कॉम’साठी एक लक्षणीय टप्पा आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला आर्थिक यंत्रणेत सामावून घेण्याच्या आणि आमच्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान-प्रेरित ऑफर्सनी देशातील क्रेडीट तूट भरून काढण्याच्या आमच्या निर्धाराला आणखीन बळकटी आली आहे.’

या क्षेत्रातील अद्यप्रवर्तक या नात्याने ‘फेअरसेंट.कॉम’ने ‘पी२पी’ कर्जाला भारतातील एक आगळावेगळा वैकल्पिक गुंतवणूक असेट वर्ग म्हणून स्थापित केले आहे. आपल्या तंत्रज्ञान-प्रेरित दृष्टीकोनाने त्यांनी भारतीय कर्जदारांना अधिक सुलभतेने कर्ज मिळविण्यासाठी सक्षम बनविले आहे आणि त्याचबरोबर देशातील गुंतवणूकदारांना पैसे कामावण्याचा एक उच्च शक्यता असलेला मार्ग सादर केला आहे. या मंचावर सध्या ४० हजारांपेक्षा जास्त कर्जदाता आणि ३.५ लाख कर्जदार नोंदलेले आहेत आणि आजवर त्यांनी एकंदर सहा हजारपेक्षा जास्त कर्जे दिलेली आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZNYBO
Similar Posts
‘पेटीएम बँके’ला नवीन ग्राहक स्वीकृतीसाठी ‘आरबीआय’ची मान्यता मुंबई : भारताची सर्वात मोठी डिजिटल बँक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला भारतीय रिझर्व बँकेकडून (आरबीआय) ३१ डिसेंबर २०१८ पासून बँक आणि वॉलेट ग्राहकांसाठी केवायसी सुरू ठेऊन नवीन ग्राहक स्वीकारण्याची अधिकृत परवानगी मिळाली आहे. त्यामुळे संभाव्य ग्राहकांना आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडता येणार आहे
‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता मुंबई : ‘लेनदेनक्लब’ ही वेतनधारक कर्जदारांना कर्ज देणारी ऑनलाइन बाजारपेठ आहे. या कंपनीला आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आहे, यामुळे या कंपनीला आता बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून व्यवसाय करता येणार आहे.
‘एनपीसीआय’द्वारे डिजिटल व्यवहारांना सुरक्षा उपक्रम मुंबई : ग्राहकांना डिजिटल रकमेच्या देवाणघेवाणीचा सुलभ, सुरक्षित अनुभव देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ही संस्था आघाडीवर असून, डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन ‘एनपीसीआय’ने अॅप्लिकेशन्समध्ये विविध सुरक्षा नियंत्रणे वापरून ग्राहकांच्या सुरक्षिततेची प्रक्रिया सुरू केली आहे
‘आरबीआय’ची तटस्थ भूमिका मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दराबाबत ‘जैसे-थे’ धोरण ठेवले असून, चलनवाढीतील आर्थिक स्लीपेजेस, क्रूड मूल्यातील बदल आणि व्यापारास संरक्षण अशा विविध चढत्या आर्थिक जोखीमी लक्षात घेता तटस्थ भूमिका स्वीकारली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language